ठाण्यातील ऐतिहासिक सेंट्रल मैदान येथे डॉ. राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशनच्या महिला क्रिकेट सराव शिबिराचे उदघाटन मुंबई क्रिकेट असोसिएशन (M C A ) चे माजी अध्यक्ष आमदार. अँड. आशीषजी शेलार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या शिबिरा अंतर्गत ठाणे जिल्हातील महिला क्रिकेट खेळाडूंना सिजन क्रिकेट मध्ये सराव करण्यासाठी नेट्स उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच या होतकरू खेळाडूंना प्रसिध्द प्रशिक्षक शुभांगी नाईक यांचे तर्फे कोचिंग देण्यात येत आहे
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजयजी केळकर ,आमदार भाजपा शहर अध्यक्ष निरंजनजी डावखरे ,प्रदेश सचिव ऍड .संदीपजी लेले, गटनेते संजयजी वाघुले, महिलाअध्यक्षा मृणालताई पेंडसे ,नगरसेविका नम्रताताई कोळी,नगरसेवक सुनील हंडोरे ,जयेंद्र कोळी,गुलशन कक्कड ,भाई तावडे ,बंडू म्हापुसकर,शशी नाईक ,सचिन पावसकर व इतर खेळाडू व मान्यवर उपस्थित होते. यासाठी सहकार्य केल्याबद्दल ठाणेस्पोर्टींग क्लब चे आभार व्यक्त करण्यात आले.
Categories: ठाणे Matters

















