दिनांक 6 डिसेंबर रोजी म्हाडा कॉलनी येथे मतदार नोंदणी व दुरुस्ती साठी कॅम्प घेण्यात आला. सन्माननीय खासदार मनोज भाई कोटक व गटनेता- नगरसेवक प्रभाकर शिंदे, यांनी या कॅम्प ला भेट दिली. वॉर्ड 106 युवा मोर्चा नितीन पाटील आणि टीम ने बाईक रॅली काढून तर मंडळ महामंत्री नंदकुमार वैती यांनी पुष्पगुच्छ देऊन खासदारांचे स्वागत केले.
प्रचंड उत्साहात पार पडलेल्या ह्या कार्यक्रमात, विशेष सहकार्य होते ते जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष वीरेंद्र सिंग आणि टीम चे. ह्या कॅम्प साठी म्हाडा मधील शक्ती केंद्रप्रमुख रवी नाईक, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजित दळवी,म्हाडा मधील सर्व बूथ प्रमुख जिल्हामंत्री काश्मीरा भट, अमोल धाईफुले, रिवेश शास्त्री वॉर्ड 106 मधील अन्य पदाधिकारी , महिला मोर्चा पदाधिकारी यांच्यासह म्हाडा मधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अस्मिता गोखले अध्यक्ष वॉर्ड १०६ यांनी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासुन आभार मानले .

Categories: मुलुंड matters











