उत्कृष्ट संसदपटू निष्णात राजकारणी, कवी ,साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या भारतरत्न मा. पंतप्रधान स्व. अटलजी बिहारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे शहर भाजपाच्या वतीने नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्या सौजन्याने तसेच जेष्ठ आमदार संजयजी केळकर व अध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे यांच्या नेतृत्वाखाली एक आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला.
” जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा “
कोरोनाच्या पाश्वभूमीवर जेष्ठांनाही शारीरिक सुदृढता राखण्याबरोबरच त्यांचे मानसिक धैर्य ,आरोग्यही आपणास उंचवायचे आहे आणि त्यासाठी हा छोटासा प्रयास. यामध्ये या जेष्ठांचा यशोचित सन्मान, तसेच विविध सुविधा देणारे ” *जेष्ठ नागरिक कार्ड “, त्यासोबतच वाफ घेण्यासाठी स्टीमर व मास्क यांचे वाटप करण्यात आले. तसेच कोरोना लढ्यात समर्थपणे भाग घेणार्या कोरोना योद्ध्या़ंचाही सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास भाजपा प्रदेश उपाध्यक्षा माधवीताई नाईक, प्रदेश सचिव संदीपजी लेले, ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेशजी मोरे, नगरसेवक सुनेशजी जोशी , ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्रजी दिघे व शहर उपाध्यक्ष डाँ राजेश मढवी हे उपस्थित होते.
Categories: ठाणे Matters

















