राज्यात ठिकठिकाणी महिला अत्याचाराच्या सातत्याने वाढत असलेल्या घटना, पूजा चव्हाण या भगिनीला न्याय आणि संजय राठोड यांच्या राजीनामा मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला. आज मुलुंड येथे केलेल्या आंदोलनामध्ये महिला मोर्चा – महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीमती उमाताई खापरे, मुंबई उपाध्यक्ष शलाका ताई साळवी, मा. आमदार श्री. मिहिर भाई कोटेचाश्री. अशोक रायजी*
(जिल्हाध्यक्ष – भाजपा ईशान्य मुंबई जिल्हा) मुलुंड विधानसभा अध्यक्ष, महिला मोर्चा ईशान्य मुंबईअध्यक्ष, जिल्हा आणि मंडळ पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह अनेक महिलांनी मोर्चात सहभाग घेतला.

Categories: मुलुंड matters











