कोरोनामुक्तझाल्यावरपरतकामालासुरुवात
गावदेवी परिसरात कब्रीस्तान भागात पावसाळ्यात नेहमीच अतिवृष्टी नंतर पाणी नागरिकांच्या घरात घुसते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी येथील नालेसफाई ही निकराची गोष्ट असते. या गोष्टीचे गांभिर्य लक्षात घेऊन स्मार्ट सिटी नाले दुरुस्ती विभागाचे इंजिनिअर सुहास राणे तसेच विभागातील ज्येष्ठ नागरिक अन्वर चाचा, मेहमूद भाई यांचेसोबत डॉ राजेश मढवी भा.ज.पा. शहर उपाध्यक्ष, ठाणे यांनी सदर नाल्याच्या दुरुस्तीबाबत पाहणी करून नाला दुरुस्ती व बाजूची तटबंदी भिंत बांधण्याबाबत चर्चा केली व योग्य तो निर्णय घेऊन काम पुढे करण्याचे ठरले.
Categories: ठाणे Matters














