अक्षयतृतीयेचे महत्व हिंदू संस्कृती मध्ये फार महत्वाचे आहे. साढे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्ताचा दिवस. या दिवसाला दान धर्माचे फार महत्व आहे. अश्याच ह्या शुभ दिवशी डॉ.राजेश मढवी फाउंडेशन व भा.ज.पा. युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्त’दान’ शिबिर १४ मे २०२१ रोजी आयोजित केले होते.
कोरोना काळात रक्तदान किती महत्त्वाचे आहे हे डॉ.राजेश मढवी यांनी शिबीराआधी विभागातील लोकांना प्रत्यक्षात भेटून त्यांना पटवून दिले. तसेच नगरसेविका सौ.प्रतिभा मढवी यांच्या प्रयत्नांनी १० पेक्षा जास्त महिलांनी रक्त’दान’ केले. त्यांच्या याच प्रयत्नांनातूनव भाजपा युवा माेर्च्याच्या माध्यमातून ९५ च्या वर लोकांनी या शिबिरात रक्तदान केले.
रक्तदान शिबिरासोबतचं माननीय आमदार संजय केळकर यांच्या हस्ते म्युकरमायकोसिस ( Black Fungus ) या आजाराच्या जनजागृती मोहिमेचाही आरंभ केला. शिबिराला नगरसेवक संदीपजी लेले, नगरसेवक संजयजी वाघुले, नगरसेवक सुनेशजी जोशी, नगरसेविका मृणालताई पेंढसे,सचिनजी केदारी, युवामाेर्च्या अध्यक्ष सागरजी मेढेकर,समर्थ नायक, भावेश चाैधरी, दळवी,प्रशांत कळंबेटे, विनायक गाडेकर, रमेश सांगळे, गाैरव सिंग,नारंग, अक्षय भाेइर,सावंत, यांनी आपली महत्वाची उपस्थिती दर्शविली.
या अनोख्या रक्त’दान’ शिबिराला उपस्थित सर्वांचे व नवजीवन ब्लड बँक च्या डॉक्टर व इतर सर्व सोबतींचेही डॉ. राजेश मढवी फाऊंडेशन आणि भा.ज.पा. युवा मोर्चा यांच्या वतीने डॉ. राजेश मढवी खूप खूप आभार मानले.
Categories: Uncategorized













