तौक्ते वादळाने मुंबई किनारपट्टीवर धुमाकूळ घातला असताना ठाणे शहरातील कमजोर झालेली तसेच जीर्ण झालेली बरीचशी झाडे उन्मळून पडत आहेत. बी-केबिन, राम मारुती रोड, गावदेवी, भास्कर कॉलनी व इतर भागात कित्येक वृक्ष आडवे झाले आहेत. परंतु आत्तापर्यंत मनुष्यहानी झालेली नाही. परंतु काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान मात्र झाले आहे. प्रभागातील जितके वृक्ष पडलेत त्यांची आपत्कालीन विभागात वेळीच तक्रार केली आहे.गोखले रोड दत्त बिल्डींग(ठाकूर) यांच्या शेड पडल्याची तक्रार अग्निशमन विभागास केली आहे. तसेच रस्त्यावर अडथळा करून पडलेल्या झाडांच्या फांद्या आमच्यातर्फे दूर करण्यात आल्या आहेत. डॉ. राजेश मढवी उपाध्यक्ष, ठाणे शहर भा.ज.पा. पुढील संकटावर पूर्णपणे लक्ष ठेऊन आहेत . ठ म प आपत्ती विभाग व अग्निशमन विभाग उत्कूष्ट काम करित आहेत.
Categories: ठाणे Matters














