खाजगी गृह संकुलांमध्ये लसीकरण केंद्र व्हावं म्हणून दिनांक २४ एप्रिल रोजी शाखाप्रमुखाचा अर्ज. पालक मंत्री एकनाथ शिंदे साहेब, ठाणे महानगरपालिका आयुक्त, व महापौर नरेश म्हस्के यांना अर्ज दिले. पालक मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्वरित शेरा देऊन अंमलबजावणी करण्यास सांगितले.
त्यानंतर साधारण याच तारखेस दुसऱ्या शाखाप्रमुखाने हिरानंदानी हॉस्पिटल हे केंद्र व्हावं म्हणून खासदार राजन विचारे जी, तसेच महापौर नरेश मस्के जी यांना अर्ज दिला. खासदार राजन विचारे साहेबांनी लगेच अर्ज करून प्रशासनाकडे मागणी केली. दिनांक 30 एप्रिल रोजी स्वतः शिवसेना विभाग प्रमुख ॲड मुकेश ठोमरे यांनी लेखी मागणी केली की लसीकरण केंद्र वाढवावी, महानगरपालिका शाळा व गृहसंकुलाच्या क्लब हाऊस मध्ये केंद्र उभारावीत जेणेकरून केंद्रांवर गर्दी होणार नाही व लोकांना लाभ घेता येईल. अशा २ केंद्रांना ॲड मुकेश ठोमरे यांच्या एनजीओ मार्फत दत्तक घेण्याचीही त्यांची पूर्ण तयारी आहे,असे त्यांनी कळवले होते , इथे लागणाऱ्या सोयीसुविधा, डॉक्टर्स नर्सेस ॲड मुकेश ठोमरे स्वतः एनजीओ मार्फत देणार होते . दिनांक 4 मे रोजी दिया हॉस्पिटल हे केंद्र होण्याकरिता ॲड मुकेश ठोमरे यांनी अर्ज केला. दिनांक ८ रोजी महापौर नरेश म्हस्के साहेब यांनी ठराव केला व खाजगी रुग्णालयात मार्फत खाजगी सोसायट्यांमध्ये लसीकरणकेंद्र करण्याची परवानगी दिली. जसा हा ठराव झाला तसे काही नगरसेवकांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना व्हॉट्सअप , एसएमएस द्वारे असं सांगितलं की त्यांच्या प्रयत्नामुळे सोसायटीमध्ये केंद्र होणार आहेत. दुसर्याच दिवशी ॲड मुकेश ठोमरे यांनी पुन्हा लिहीलं, ठाणे महानगरपालिकेने खाजगी रुग्णालयांना फक्त केंद्र होण्याकरिता परवानगी दिली आहे. पण त्यांना त्यासाठी लागणार्या लसीं कोण पुरवणार? केंद्र सरकारने खाजगी रुग्णालयांना देण्यास मनाई केली आहे, राज्य सरकारला ही परवानगी दिली नाही, मग त्यांना लस कोठून मिळणार? तर ह्या रुग्णालयांना
स्वतः लस उत्पादक कंपन्यांकडून लशी विकत घेण्यास सांगितले. या कंपन्यांना केंद्र सरकारने केंद्राची मोठी मागणी मार्च अखेरीस दिली. त्यामुळे या कंपन्या राज्यालाही लस देण्यास सक्षम नव्हत्या तर त्या कंपन्या खाजगी हॉस्पिटल ना लसीं कशी देणार?
जवळपास १३० खाजगी हॉस्पिटल्स ने अर्ज केले होते त्यामधून ८५ हॉस्पिटल्सना परवानगी देण्यात आली, ज्यामध्ये शिवसेनेने मागणी केलेल्या, होरायझन प्राईम हॉस्पिटल, हिरानंदानी इस्टेट हॉस्पिटल व दिया हॉस्पिटल चा समावेश होता.
यावरही काही नगरसेवकांनी ,आम्ही मागणी केलेल्या हॉस्पिटल्स ना त्यांनी मागणी केली म्हणून मिळाले असे सर्व गृहसंकुलातील पदाधिकाऱ्यांना सांगितले. हे लोकांची दिशाभूल करणे आहे, त्यांने खरोखरच चांगलं काम केलं आणि त्याचा श्रेया घेतला तर कोणाला काही हरकत असन्याचा संबंध नाही.
शिवसेने मार्फत या सर्व केंद्रांवर जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्याचा त्यांचा मानस आहे.
त्याव्यतिरिक्तही शिवसेना विभाग प्रमुख ॲड मुकेश ठोमरे यांनी काही मागण्या केल्या आहेत, ज्या मधील काही मागण्या मान्य झाल्या, बाकी मागण्यांचा पाठपुरावा ते करीत आहे, आणि काही कोर्टाचे आदेश आहेत ते व्हावं म्हणून.
१) ज्येष्ठ नागरिक व शारीरिक व्याधी असलेल्यांना ड्राईव्ह थ्रु च्या माध्यमातून लसीकरण देणं, जी मान्य झाली व ठाण्यात सुरू झाली आहे.
२) जा नागरिकांकडे आधार कार्ड नाही अशांनाही लस मिळावी अशी मागणी होती, कालच UIDAI नी जाहीर केला, करोना च्या कोणत्याच बाबतीत आधार कार्ड सक्तीचे करु नये.
३) तिसरी मागणी होती, ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, शारीरिक व्याधी असलेले व अंथरुणाला खिळलेल्या लोकांकरिता घरोघर जाऊन लसीकरण करण्या बाबत. यासंदर्भात आत्ताच एक जनहित याचिका दाखल झाली आहे, ज्याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे.
४) चौथी मागणी आहे, पुढे येणाऱ्या करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये सर्वात जास्त लहान मुलं बाधित होणार आहेत. आज जर आपण १८ ते ४४ या वयोगटाला लस देण्यास असमर्थ असलो तर लहान मुलांना कधी देणार? म्हणून त्यांची मागणी आहे, ज्यांना लहान मुलं आहेत निदान त्या पालकांना लसीचे दोन्ही डोस तिसऱ्या लाटेच्या येण्या आधी मिळावे.
Categories: ठाणे Matters











