शिवसेना विभाग क्र ११ मधील प्रभाग क्र २ हा वाघबीळ रस्ता म्हणजेच विजय गॅलेक्सि, एनक्लेव, विजयनगरी, अंनेक्स, वसंत लीला, अणू नगर व पूजा कॉम्प्लेक्स पासून सुरु होऊन हिरानंदानी इस्टेट, ब्रह्माण्ड, डोंगरीपाडा , पातलीपाडा व कोलशेत गावाचा काही भागा
पर्यन्त जातो. या प्रभागामध्ये उच्चभ्रू वस्त्या देखील आहेत व दारिद्र्य रेषे खाली असणारे झोपडपट्टीधारक देखील आहेत. या प्रभागामध्ये ठाणे महानगर पालिकेचे एकही आरोग्य केंद्र नाही, येथील नागरिकांना मानपाडा, आझाद नगर व कासारवडवली येथील आरोग्य केंद्रात जावे लागते. या प्रभागातील लोकप्रतिनिधींनी इतक्या वर्षात आरोग्यकेंद्रासाठी प्रयत्न केलेले दिसत नाहीं या करिता शिवसेना विभाग प्रमुख ऍड. मुकेश बाळकृष्ण ठोमरे यांनी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व ठाणे महानगर पालिका महापौर श्री नरेशजी म्हस्के साहेब यांस मागणी पत्र लिहिले आहे व कमीत कमी मागील वर्षी आलेल्या कोरोना महामारी नंतर तरी स्थानिक नगरसेवकांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे होते असे कंत ऍड. मुकेश ठोमरे यांनी व्यक्त केले .
२०११ च्या जनगणनेनुसार या प्रभाग क्र २ ची लोकसंख्या ४८००० इतकी होती, आज २०२१ मध्ये ती अंदाजे दुप्पट झाली असावी. या दुप्पट झालेल्या लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण करण्यासाठी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख व ठाणे महानगर पालिका महापौर श्री नरेशजी म्हस्के साहेब यांना पत्राद्वारे मागणी केली आहे कि पातलीपाडा येथे पूर्वी अन्नछत्रासाठी जी जागा आरक्षित करण्यात आली होती व काही महिन्यापूर्वी या वास्तूचा उपयोग इतर उपक्रमासाठी करण्याचा ठराव देखील मांडण्यात आला होता त्या जागी प्रभाग क्र २ साठी येथे लवकरात लवकर तात्पुरते आरोग्य केंद्र सुरु करण्यात यावे. या वास्तुबाहेर महानगर पालिकेने एक रास्ता देखील बनवला आहे ज्याचा वापर होण्यास फार विलंब होणार आहे, तरी त्याचा उपयोग आपल्याला आरोग्यकेंद्रासाठी करता येईल असे ऍड. मुकेश ठोमरे यांनी सांगितले .

Categories: ठाणे Matters











