ठाणे Matters

नगरसेविका सौं. मालती रमाकांत पाटील व लोकनेते श्री. रमाकांत पाटील यांची लोकप्रियता वाढीवर

ठाणेकर वाडी येथे दिपकिरण सोसायटी व परिसरातील शेकडो नागरिकांना पावसाळ्यात परिसरात तुंबणाऱ्या पाण्यापासून तसेच घरगुती व इमारती मधील शौचालयाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता त्यामुळे शेकडो कुटूंबाना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास होत होता.
शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते श्री. संजीव गुप्ता यांनी परिसरातील व इमारती मधील नागरिकांसोबत चर्चा करून नगरसेविका सौं. मालती रमाकांत पाटील यांना निवेदन दिल्यानंतर सदर स्थानिक नगरसेविका सौं. मालती रमाकांत पाटील व राष्ट्रीय माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. रमाकांत ( दादा ) पाटील यांनी लगेच संबधित अधिकारी श्री. सजनानी साहेब यांच्या सोबत पाहणी दौरा करून लगेच कामास सुरवात केली व नव्याने मल:निस्सारण (ड्रेनेज लाईन) टाकून दिले .
पावसाळ्यापूर्वी काम करून दिल्या बद्द्ल परिसरातील शेकडो कुटुंबानी होणाऱ्या त्रासाचा सुटकेचा निःश्वास टाकला व नगरसेविका सौं. मालती रमाकांत पाटील समाज सेवक श्री. रमाकांत ( दादा ) पाटील शिवसेनेचे युवा नेते श्री. संजीव गुप्ता व ह. भ. प श्री. सखाराम महाराज इंदोर यांना बोलावून त्यांना श्रीफळ व पुष्पगुछ देऊन आभार मानले व नागरिक तसेच कुटुंबियाच्या माध्यमातून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a comment