ठाणे Matters

मराठा संघ ठाणे शहर अध्यक्ष पदी उमेश गोगावले यांची निवड

भारतीय मराठा संघ अध्यक्ष (संस्थापक) मा. अविनाशजी रामचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मिटिंग मध्ये ठाणे शहर अध्यक्ष पदाची नेमणूक करण्या साठी भाजपा (ठाणे शहर जिल्हा उपसंघटक सोशल मीडिया सेल) तसेच विविध सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट मध्ये राहणार्या श्री.उमेश विनायक गोगावले यांची निवड करण्यात आली.यावेळी भारतीय मराठा संघ अध्यक्ष (संस्थापक) मा. अविनाशजी रामचंद्र पवार साहेब,सरचिटणीस राजेंद्र बाळाराम पालांडे, उपाध्यक्ष दीपक वसंतराव पालांडे ,सचिव एस.डी. पाटील जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी पाटील, महिला जिल्हा अध्यक्ष विध्या ताई कदम ,समर्पक प्रमुख अरूणजी फणसे उपस्थित होते.

Leave a comment