ठाणे Matters

डॉ राजेश मढवी यांचा प्रभागात नागरिकांना मदतीचा हात

अतिव्रूष्टीमुळे जनजीवन विस्कळीत व नागरिकांना मदतीचा हात

रात्री २.-३० वाजल्यापासून अचानक झालेल्या अतिव्रूष्टीमुळे नित्यनियमाने भास्कर काँलनी,चिखलवाडी, तबेला, भांजेवाडी हा लोलाईंग पट्टा जलमय झाला. स्थानिक गोरगरिबांची घरे छातीभर पाण्याखाली होती. सोसायट्या तुडुंब भरल्या होत्या. काही ठिकाणी पाण्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला हाेता. तबेल्यातील जनावरे रस्त्यावर आली होती. स्लम मधील नागरिक रस्त्यावर उभी होती. हे कळताच भाजपा उपाध्यक्ष ठाणे डॉ राजेश मढवी यांनी या बिकट प्रसंगी आपत्ती व्यवस्थापनाच्या संतोष कदम यांच्याकडे मदत मागीतली. त्यांनी त्वरीत टीडीआरएफ ही रेस्क्यु टीम पाठवीली. स्लममध्ये पाण्यात अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी ते त्वरीत हजर झाले. स्वतः पाण्यात उतरून डॉ राजेश मढवी यांनी पाहणी केली. बाधीत महिला व लहानग्यांना आसरा म्हणून मानस सोसायटीचा एक दुकानाचा गाळा उपलब्ध करण्यात आला. त्यानंतर भांजेवाडी भागातील पंप चालू करून पाण्याचा निचरा करण्यात आला.नागरिकांना नाश्ता व पाणीवाटप करण्यात आले. अतिव्रूष्टीमुळे सामान्यांचे खूप नुकसान झाले..

Leave a comment