
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला होता , यावेळी मुख्यमंत्र्यांकडून ‘शिवसंपर्क’ मोहीमेची घोषणा करण्यात आली. मोहिमेंतर्गत प्रत्येक गाव पातळीवरील पदाधिकारी व शिवसैनिकांशी संपर्क करून जनसेवा करण्याकरिता शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शाखाप्रमुखांना प्रत्येक घराघरात जाऊन लोकांनी लस घेतली की नाही याची माहिती घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले, इतर काही अडचणी आहेत का? विकासात्मक योजना त्यांच्या पर्यंत पोहचत आहेत की नाही, याचीही माहीती घ्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगितलं जातं . गाव स्तरापर्यंत संघटनेची बांधणी मजबूत व्हावी या हेतूने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन केले.12 जुलैपासून राज्यभरात शिवसंपर्क मोहीम राबवली जात आहे . या मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी केली जाणार आहे. ‘शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2022’ असं या मोहिमेच नाव असणार आहे.येत्या वर्षभरात 20 महानगरपालिका, 27 जिल्हा परिषद आणि 300 नगरपालिका तसेच 325 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत.
“शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2022” याकार्यक्रमात कल्याण जिल्हा प्रमुख श्री. गोपाळजी लांडगे यांच्यासह आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांशी संवाद साधला.

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री माननीय श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभर सुरू असलेले ‘शिवसंपर्क अभियान’ गुरुवारी पालकमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या सूचनेनुसार उल्हासनगर येथे उत्साहात पार पडले. याकार्यक्रमात कल्याण जिल्हा प्रमुख श्री. गोपाळजी लांडगे यांच्यासह आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांशी संवाद साधला.
यावेळी येणाऱ्या काळात जन हिताची अधिकाधिक कामे करून, पक्ष मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला. महाराष्ट्रात माननीय उद्धवसाहेबांच्या समर्थ नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती सर्व घटकांपर्यंत पोहचवून शहरातील प्रत्येक घराघरात शिवसेनेचे विचार पोहचवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी केला.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.चंद्रकांत बोडारे, महापौर श्रीमती लीलाताई आशान, शहरप्रमुख श्री.राजेंद्र चौधरी, उपशहरप्रमुख श्री. राजेंद्र शाहू, श्री.संदीप गायकवाड, श्री.कैलाश तेजी, नगरसेवक गटनेते श्री. रमेश चव्हाण, नगरसेवक श्री. धनंजय बोडारे, श्री.अरुण आशान, श्री.आकाश पाटील, नगरसेविका सौ.ज्योती माने, महिला शहर संघटक सौ. मनिषा भानुशाली, विभाग प्रमुख श्री. दत्तात्रय पोळके, श्री. राजेश माने, उपविभाग प्रमुख श्री.आदिनाथ कोरडे, श्री.अनिल मराठे तसेच शाखा प्रमुख, महिला आघाडी, युवासैनिक आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
Categories: कलयाण matters


















