Thane matters

आदरणीय शरद पवार साहेब यांच्या ८१व्यां जन्मदिनानिमित्त १००० शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे स्थानिक नेते श्री पुरुषोत्तम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते १००० शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

देशाचे धुरंधर नेते आणि महाराष्ट्राचा जाणता राजा आदरणीय शरद पवार साहेब यांच्या ८१व्यां जन्मदिनानिमित्त ठाणे घोडबंदर रोडवरील कींगकाँग नगर फुफाने चाल, डोंगरी पाडा, तसेच समता नगर पातली पाडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे स्थानिक नेते श्री पुरुषोत्तम पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते १००० शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६ वह्यांचा संच असा मोफत वह्या वाटप करण्यात आला .

सदर प्रसंगी उपस्थित ठाणे शहर ओबीसी सेल अध्यक्ष गजानन चौधरी, विधानसभा क्षेत्र उपाध्यक्ष गणेश शिंदे, उत्तर भारतीय सेल ब्लॉक अध्यक्ष बलदेव सोनी, सामाजिक न्याय विभाग ब्लॉक अध्यक्ष प्रशांत खुटे, प्रभाग क्रमांक १ वॉर्ड अध्यक्ष मनोज पाटील, वॉर्ड अध्यक्ष किशोर धोत्रे, उत्तर भारतीय सेल वॉर्ड अध्यक्ष त्रिलोकी चौबे, युवा नेता राहू पुरुषोत्तम पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते मनजीत सिंग अरोरा, किसन फुफाने, ईश्वर सोनावणे, सुधाकर माळी, ह्यांचा हस्ते ही काही विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले .

राजकारण आणि समाजकारणामध्ये वेळेला कवेत घेऊन चालणाऱ्या ८१ वर्षाच्या तरुणयोद्धया युगपुरुषाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत ठाणे शहर जि.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे शहर जि.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्री पुरुषोत्तम पाटील ओवळा माजिवडा विधानसभा अध्यक्ष यांनी हा उपक्रम हाती घेतले . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीतुल जिरावळे, प्रदीप पाच कुदे, विहंग पाच असंख्य कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली त्यामध्ये निलेश महाले, संदीप मोहर, ओमकार डोके, हर्षद भोये, समीर मते, सागर घेगड, अकुडे, रत्नदीप मोहिते, मयुर घोलाई, आशिष लोंढे, सुरेश खंदारे, अंकित पागे, किरण घोलई, मनिष शिंदे, सूरज दळवी, पंकज गुजर,दुंद्या इत्यादी कार्यकर्ते विशेष प्रयत्न करत होते.

Leave a comment