डॉ . राजेश मढवी स्पोर्टस असोसिएशन, दैवज्ञ क्रिकेट क्लब व स्पोर्टिंग क्लब कमीटी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात पहिली मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यताप्राप्त महिलांची क्रिकेट स्पर्धा सेंट्रल मैदान ठाणे येथे आयोजित करण्यात आली आहे. सदरची स्पर्धा दिनांक १३ डिसेंबर पासून २८ डसेंबर पर्यंत खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन इंडिया टीमची स्टार क्रिकेटर पूनम रावत हिच्या शुभहस्ते झाले . प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय आमदार प्रवीणजी दरेकर, विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र राज्य भाजपा ठाणे अध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे, प्रदेश सचिव संदीपजी लेले, परिवहन सभापती विलासजी जोशी , नगरसेविका प्रतिभा मढवी , दांडेकर बंधू,ओवळेकर, हे मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत २७ सामने होणार आहेत आणि ठाणे जिल्ह्यातील टॅलेंटेड खेळाडू क्रिकेट जगताला पाहण्यास मिळणार आहेत अशी माहिती टुर्नामेंटचे आयोजक डॉ. राजेश मढवी यांनी दिली.










Categories: Thane matters











