Dr Rajesh Madhviठाणे Matters

समाजसेवक डॉ. राजेश मढवी यांना सामाजिक क्षेत्रातील व वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

सुलक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी, औरंगाबाद* यांच्या संयुक्त विद्यमाने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त समाजसेवक डॉ. राजेश मढवी यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२१ गुरुवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.
माणुसकी चा पाचवा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा- सकाळी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी एक ठाणे जिल्ह्यातील डॉ. राजेश मढवी यांना समाजसेवेतील व वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला असून ते राजेश मढवी फाउंडेशन मार्फत आरोग्य सेवा, ठाणे गौरव समिती ठाणे मार्फत आरोग्य सेवा, अनाथ मुलांसाठी अनेक सेवा, आदिवासी पाड्यात जाऊन आरोग्य सेवा, दर वर्षी पंढरपूर वारकरी साठी रस्त्यावर चार दिवस रुग्ण सेवा, आदिवासी मुलं मुलं मुलाखती साठी ठाण्यात आले तर सर्वाना राहण्याची व जेवणाची वेवस्था, गोर गरीब लोकांना मोफत धान्य वाटप, कृत्रिम अवयव मोफत वाटप, अपंगाना मदत, सायकल वाटप, गरीब विदयार्थी मदत अशी अनेक त्यांची काम आहेत, महिला सक्षमी कारणासाठी महिलांना खूप मदत केली जाते
जागतिक महिला दिनी अनेक महिलांसाठी कार्यक्रमांची आयोजन, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर यासारखे उपक्रम सहकारी व मित्रपरिवार सोबत घेऊन रुग्णासेवेसाठी राबवत असतात. डॉ. राजेश मढवी यांची माणुसकी समूहाच्या सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्या बाबत पत्रद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमीत पंडित यांनी कळवले आहे. ह्या पुरस्काराबद्दल डॉ. राजेश मढवी यांचे समाजामध्ये सर्वेत्र कौतुक केले जात आहे.

Leave a comment