शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले, बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? टॅक्स पावती दाखवत त्यांनी थेट संजय राऊतांना सवाल केला बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे जोड्यानं कुणाला मारणार? अलिबाग येथील १९ घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी भरला , बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? टॅक्स जर भरला नाही तसे लिहून द्यावे आणि घरे त्यांची नाहीत असे पुरावे द्यावे. माझ्या वर जे आरोप केलेत त्याची खुशाल चौकशी करा असे सोमय्या म्हणाले. घर वनखात्याच्या जमिनीवर असल्याचे त्यावेळी किरीट सोमय्या म्हणाले . किरीट सोमय्यांनी ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील सादर केला . किरीट सोमय्या, नील सोमय्या यांना जेलमध्ये जाण्याची भाषा न करत ठाकरे सरकारने १९ बंगल्यांची चौकशी करावी. मी महाराष्ट्रातील जनतेसाठी लढत आहे. मला ब्लॅकमेलर म्हणणे चुकीचे आहे. किरीट सोमय्या यांनी कोवीड सेंटरमध्ये झालेल्या घोटळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आणि माझ्या वर जे आरोप केलेत त्याची खुशाल चौकशी करा असे सोमय्या म्हणाले.
Categories: महाराष्ट् matters, मुंबई matters











