संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे, त्यांना सुपारी मिळाली-राणे
नारायण राणेंनी आज पत्रकार परिषिंदेत संजय राऊत पूर्ण राष्ट्रवीदचे आहेत व त्यांनी राष्ट्रवादीकडून सुपारी घेतली आहे असे आरोप केले . संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आहे असा आरोप राणेंनी केला आहे.
मंगळवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केल्यानंतर भाजप नेत्यांनी राऊतांच्या आरोपांचा समाचार घेतला आहे . महाराष्ट्रात सध्या राजकारण तापले असून एकमेकांचे कपडे लोकांसमोर काढण्याचे एकही प्रसंग राजकारणी सोडत नाहीं., यात नारायण राणे कसे गप्प राहतील .
नारायण राणेंनी आज संजय राऊतांचे वाभाडे काढले. प्रवीण राऊतने ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर संजय राऊत अस्वस्थ झाले आता माझा देकील नंबर येईल म्हणून अस्वस्थ झाले. लोकप्रभात असताना बाळासाहेब आणि उद्धव वर टीका करणारा आज म्हणतो, माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वीदाने अशा भाषेत राऊतांची क्लास लावली .
टीका करत असताना संजय राऊत यांच्या कालच्या पत्रकार परिषदेला कोण महत्वाचे नेते होते असा सवाल देखील उपस्थित केला. नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकर कोण असा प्रतिसवाल करुन ते मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते का, आता नेता बनला. तोच का? असे बोलत मिलिंद नार्वेकर ला देखील घेरले. राऊत हे काहीही पुरावा नसताना आरोप करत आहेत माझ्याकडे राऊतांची संपूर्ण कुंडलीच आहे कधीही बाहेर काढू शकतो हे राऊतांनी लक्षात ठेवावे. राऊतांच्या आरोपांना आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
Categories: महाराष्ट् matters, मुंबई matters











