महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाची बैठकमुंबई matters

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाची बैठक

दिनांक १२/०३/२०२२ ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाची बैठक काँग्रेस मुख्यालय टिळक भवन दादर मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्षा विद्या कदम यांच्या अध्यक्षस्थानीआयोजित करण्यात आली . या कार्यक्रमात भारतरत्न सुर सम्राज्ञी लता मंगेशकर यांना सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रियांका जाधव यांच्या गायनाने व कला क्षेत्राशी सर्व दिवंगत कलाकारांना श्रद्धांजली वाहून तर महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित प्रतिमेस पुष्पमाला अर्पणकरून अभिवादन करण्यात आले.

या बैठकीत भाई नगराळे व नितीन पाटील यांनी डिजिटल सभासद नोंदणी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले तसेच संघटना व कलाकारांचे प्रश्न या विषयावर मुनाफ हकीम व यशवंत हप्पे यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यात कलावंताची कोर कमिटी स्थापन करणे आणि सांस्कृतिक विभागा मधील सर्व योजना, शासकीय व प्रशासकीय कामगिरी बद्दल गणेश लिमजे यांनी मार्गदर्शन केले, स्वातंत्र्य संग्राम व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनजागृती साठी कलाकारांचे योगदान या विषयावर खलील सैय्यद यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत ठाणे शहर जिल्हा काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष स्वप्नील भालचंद्र कोळी यांनी आपल्या भाषणात प्रत्येक सांस्कृतिक विभागाच्या जिल्हा अध्यक्षस त्या जिल्हातील सांस्कृतिक विभागाच्या शासकीय कमिटीवर नेमणूक करण्याचा प्रस्ताव कमिटी समोर मांडला.

कार्यक्रमाची रूपरेषा फरजाना डांगे यांनी केले बैठकीची प्रस्तावना सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्षा मा.विद्या कदम यांनी केले, या बैठकीत खालील ठराव संमत करण्यात आले,
१) जिल्हास्तरीय वृध्द कलावांत मानधन कमिटी वर काँग्रेस सांस्कृतिक विभागाचा जिल्हाध्यक्ष कायम सदस्य नियुक्ती करण्यात यावा. २) परीक्षक म्हणून कलाकारांची २५ प्रयोगाची अट शिथिल करून ५ प्रयोग करण्यात यावी.
३) ग्रामीण शहरी व पारंपरिक कलाकारांचे सर्वेक्षण करून त्याच्या उन्नती साठी महारष्ट्र शासनाने धोरण निश्चित करावे.
४) प्रदेश , जिल्हा , तालुका स्तरावर सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काँग्रेस पक्षाचे कलाकारांना प्राधान्याने संधी देणे बाबत कार्यवाही करण्यात यावी तसेच वर्षानुवर्षं कायम असलेले परीक्षक हटवण्यात यावे व नवीन परिक्षकांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी, सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश समित्यांवर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नियुक्त करण्यात यावेत.
५) प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक विभागाच्या वतीने कला भवन बांधण्यात यावेत व नवोदित कलाकारांना सराव व प्रयोग करण्यासाठी मोफत देण्यात यावेत या कला भवणची मालकी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग गांधी घराण्याची काँग्रेस असलेल्या पदाधिकारी यांचे कडेच राहील या विषयावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात आला, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा.आ.नाना पटोले व सांस्कृतिक विभागाचे मंत्री मा.ना.अमित विलासराव देशमुख यांच्या सोबत संयुक्त बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यात यावे असे ठरले, या सर्व विषयावर चर्चा करून ठराव संमत करण्यात आले या कार्यक्रमा मध्ये गरीब होतकरू महिलांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले बैठक अतिशय चांगल्या प्रकारे उत्साहपूर्ण वातावरणात केले राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली, तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक विभाग राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करून उत्साहपूर्ण वातावरणात बैठक संपन्न झाली.!

बैठीकी मध्ये उपस्थितीत मान्यवर, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष भाई नगराळे, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष नितीन पाटील, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, माजी प्रदेश सरचिटणीस यशवंत हपे, प्रदेश सांस्कृतिक विभागाचे राजकीय सल्लागार खलील सैय्यद, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष सम्राट साळवी, प्रदेश कार्याध्यक्षा फरझाना इकबाल, प्रदेश कार्याध्यक्षा समीरा मेस्त्री, प्रदेश सचिव जनाबाई सावंत, सांस्कृतिक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष / विदर्भ समन्वयक गणेश लिमजे, भंडारा जिल्हा कार्याध्यक्षा सुचिता गजभिये, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षा सायली देठे , चंद्रपूर शहर अध्यक्ष प्रमीत माहूरकर, गोंदिया जिल्हा महासचिव नितीन साखरे, गोरेगाव तालुका अध्यक्ष घनश्याम टेंभुर्ने, आमगाव तालुका यद्राम मोहनकर, आमगाव तालुका उपाध्यक्ष हरीचंद्र शहारे, प्रदेश उपाध्यक्ष / अमरावती समन्वयक सचिन गुडे, प्रदेश उपाध्यक्ष / मराठवाडा समन्वयक आरिफ शेख, प्रदेश उपाध्यक्ष / पश्चिम समन्वयक महादेव कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष /कोकण समन्वयक राकेश चौहान, रमाकांत बोरुडे, संजय थोरात, अल्ताफ सैय्यद औरंगाबाद, पांडूरंग देशपांडे बीड, नीलकमल जयस्वाल, एकनाथ हनुमंते, प्रशांत नांदगावकर, मनोहर देसाई मुंबई, मितेश मेस्त्री, शबाना शेख मुंब्रा, कविता कदम सोलापूर, डॉ विशाल वाळूज पुणे, विनोद गुप्ता, अनिल गोरे, अपराजिता शर्मा, पुनम शर्मा, सरिता मिश्रा, स्वप्नील कोळी, सुनील जगताप, मयूर कावळे, नेहा धारूरकर, विजय परेरा, डॉ बापू चंदनशिवे, रेवणनाथ देशमुख अहमदनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a comment