ठाणे महापालिकेतर्फे सद्या ठिकठिकाणी नालेसफाईची कामे सुरु आहेत. प्रभाग क्र.१ मधील विविध ठिकाणच्या सुरु असलेल्या नालेसफाईच्या कामांची महापालिका आयुक्त मा.डॉ.विपिन शर्मा यांनी पाहणी केली. नालेसफाई पाहणी दौ-यावेळी नगरसेवक नरेश मणेरा सह, नगरसेविका सौ.साधना जोशी, महापालिका अधिकारी संदीप माळवी- अतिरिक्त आयुक्त १, संजय हेरवाडे- अतिरिक्त आयुक्त २, डॉ.बालाजी हळदेकर, मनिष जोशी-उपआयुक्त, दिनेश तायडे- उपआयुक्त, प्रीतम पाटील- सहा.आयुक्त, दत्ता शिंदे- उप अभियंता, संजय कदम- कार्यकारी अभियंता, राजेंद्र कुसुरकर, निशांत पवार मा.महापालिका आयुक्तांसोबत होते. यावेळी मोघरपाडा आणि ओवळा नाला याठिकाणी शेवाळे साचत असल्याने त्याठिकाणी जेसिबी जाऊ शकत नसल्याने या दोन्ही नाल्यांची सफाई पावसाळयाआधीच पूर्ण करण्याची सूचना मी मा.महापालिका आयुक्तांना केली त्यानूसार मा.महापालिका आयुक्तांनी तसे आदेश संबंधितांना जागेवरच दिले.
प्रभाग क्र.१ मधील पार्कवुड नाला, विजय वाटीका, दलाल इंजीनियरिंग कं. नाला, या नाल्यांची पाहणी देखील करण्यात आली . प्रभागातील सर्व नाल्यांची सफाई सुरु असून आत्तापर्यंत सुमारे ६०% काम पूर्ण झालेले आहे. येत्या पावसाळ्यापूर्वीच प्रभागातील नालेसफाईचे काम व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यात येईल . नाल्यांच्या आसपास असणा-या घरे व वस्तीतील नागरिकांनी आपला कचरा नाल्यात फेकू नये अशी विनंती आहे नगरसेवक नरेश मणेरा यांनी केले .

Categories: Uncategorized











