दिनांक ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो, याच दिनाचे औचित्य साधून, विनोद मेमोरियल सोसायटी व वाघबिळ रेसिडेंट ग्रुप यांनी येऊर येथे स्वच्छता मोहीम राबविली. सदर कार्यक्रमासाठी ४० हून अधिक लहान मुलं व त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
निसर्ग ट्रॅक व स्वच्छता मोहीम अशी या कार्यक्रमाची रूपरेषा होती, साधारण २ किलोमीटर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये आत जाऊन ही मोहीम राबवली.
गोळा केलेला प्लास्टिक व कचरा ठाणे महानगरपालिका प्लास्टिक रिसायकल विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. सर्व लोकं दमून गेले होते, पण पर्यावरणा करिता खारीचा वाटा म्हणून काहीतरी केल्याचे समाधानही सर्वांच्या चेहऱ्यावर होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता येऊर वनविभाग, मितेश पांचाळ जी, पीटर डिसूझा जी यांनी विशेष पुढाकार घेतला, तसेच विनोद मेमोरियल वेलफेअर सोसायटी व वागवेल रेसिडेंट ग्रुप च्या सर्व सभासदांनी सहकार्य केले. विनोद मेमोरियल चे संस्थापक एडवोकेट मुकेश ठोमरे यांनी सर्वांचे आभार मानले व तसेच अनेक उपक्रम हाती घेणार असल्याची माहिती दिली.

Categories: Uncategorized











