दिनांक ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो, याच दिनाचे औचित्य साधून, विनोद मेमोरियल सोसायटी व विजय नगरी फेडरेशन यांनी, हिरवा स्वप्न यांच्या माध्यमातून फुलपाखरां करिता बाग उभारली. सदर कार्यक्रमासाठी लहान मुलं व त्यांच्या पालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हिरवा स्वप्नाचे श्री अनिल वाघ यांनी सांगितले ह्या झाडांना पुढच्या आठवड्यापासून फुलं येऊ लागतील व फुलपाखरे ही दिसु लागतील.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अनिल वाघ जी, सुचित्रा कुलकर्णी जी, प्रीती देसाईं जी, अरुण नायर जी, माळी संतोष जी व विजयनगरीतील रहिवाशांना सहकार्य केले. विनोद मेमोरियल चे संस्थापक एडवोकेट मुकेश ठोमरे यांनी सर्वांचे आभार मानले.









Categories: Thane matters











