आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी जेएम म्हात्रे चॅरिटेबल संस्था आणि सिनेसृष्टीतील दिवंगत अभिनेते स्वर्गीय भगवानदादा पालव यांची नात सुनेत्रा अरुण पालव यांच्या ट्रायबल ग्रीन्स संस्तेच्या संयुक्त विधमाणे रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते . यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पनवेल अर्बन बँकेचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पनवेल मधील प्रतिष्ठित डॉक्टर, विविध क्षेत्रातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . या महोत्सवाचे उद्घाटन आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी आदिवासी बांधवांसाठी रानभाज्यांची प्रदर्शन आणि विक्रीसाठी एक ग्राहक पेठ निर्माण होईल या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले . १५ पेक्षा जास्त भाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाला पनवेल आणि उरण मधील नागरिकांनी भेट दिली. . तसेच ३५०० पेक्षा जास्त भाज्यांच्या जुडयांची विक्री झाली. विशेष म्हणजे या महोत्सवाला तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती. डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीच्या फार्मासुटिकल डिव्हिसनच्या विद्यार्थ्यांनी या भाज्या कुठे आणि कशा प्रकारे उगवतात, त्यांचे कोणते गुणधर्म असतात इत्यादी माहिती जाणून घेण्यासाठी या उपक्रमाला भेट दिली . रानभाजी कशी करावी त्याची पद्धत सांगण्यासाठी आदिवासी भगिनींना फूड स्टॉल उपलब्ध करून दिले होते, स्टॉल वर भाजी बनवून ती भाकरी सोबत उपस्थित सर्वांना खाण्यासाठी उपलब्ध होती. स्वास्थ्याच्या दृष्टीने श्रावण महिन्यात येणाऱ्या डोंगर दऱ्यामधील रानभाज्या या उपयुक्त असतात आणि पानवेलकरांना त्याचा पुरेपूर फायदा विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी करून दिला . या कार्यक्रमासाठी आमदार श्री बाळाराम पाटील , मा.नगराध्यक्ष श्री.जे.एम.म्हात्रे , सहकारी नगरसेवक, नगरसेविका यांच्यासोबतच ट्रायबल ग्रीनचे फाउंडर सुनेत्रा अरुण पालव, श्री.राजेंद्र सरोज, श्री.जफर पिरझाडा, सौ.चंचला बनकर, श्री.पंढरी शेट्टी, श्री.किरण वर्मा, डॉ. केरीन तेरी, दोन्ही संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग तसेच पनवेल शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Categories: पनवेल matters











