Ravindra moreThane matters

मनसेकडून पालिका शहर अभियंत्यांना कुंभकर्णाची प्रतिमा भेट

ठाण्यातील खड्ड्यांच्या मुद्यावर मनसे आक्रमक

महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून याबाबत मनसेच्या शहर पदाधिकाऱ्यांनी पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. मनसे पदाधिकार्‍यांनी सोनाग्रा यांना कुंभकर्णची प्रतिमा भेट दिली. तसेच रस्त्यावरील खडडे बुजवले नाहीतर गणेशोत्सवनंतर रस्त्यावर उतरू, असा इशाराही दिला.

ठाणे महापालिका क्षेत्रातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर खडे पडले आहेत. खड्ड्यांमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून याबाबत मनसेच्या शहराध्यक्ष रविंद्र मोरे व पदाधिकारीयांनी नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला. खड्ड्यामुळे कोपरी येथे झालेल्या अपघाताबाबत नगर अभियंत्यांना माहितीच नसून त्याचबरोबर शहरात कुठे खड्डे आहेत, याबाबतही त्यांना माहीत नाही, असा आरोप ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी केला आहे.

ठाण्यातील रस्त्यांची अवस्था सुधारावी, यासाठी शासनाच्या नगर विकास विभागाच्या वतीने ठाणे महापालिकेला १८३ कोटींचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये सिमेंट काँक्रिट, डांबरीकरण आणि युटीडब्लुटी पद्धतीने रस्ते करण्याच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या. मात्र, केवळ कागदी घोडेच नाचवण्यात आले असुन ठाण्यातील १२७ रस्त्याची कामे गेल्या तीन महिन्यांपासून रखडलेली आहेत.

स्स्त्यांबर ६ वर्षात १३०० कोटींची उधळपट्टी गेल्या सहा वर्षांमध्ये ठाणे महापालिकेने रस्त्यांवर ९ हजार ३२९ कोटी रुपये खर्च केला आहे. ठाणे महापालिकेकडून रस्त्यांवर अमाप खर्च होत असतानाही दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लोकांचा बळी जात आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आज ठाणेकर आपला जीव गमवत आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात वातावरण बिघडू नये म्हणून आम्ही शांत आहोत. खडडे बुजवले नाहीतर गणेशोत्सबानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला.

Categories: Thane matters

Tagged as:

Leave a comment