ठाण्यातील दिव्यांगांसाठी दिवाळी साजरी करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या डॉ.राजेश मढवी फाउंडेशन आयोजित एक पहाट आपुलकीची ..दिव्यांगांसोबत दिवाळी पहाट या कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील विश्वास संस्था,जाग्रूती संस्था,झवेरी कर्णबधिर शाळा,कमलीनी,राजहंस फाउंडेशन, सेंट जॉन शाळा,होली क्रॉस शाळा,दिव्यांग कला केंद यातील १०० हून अधिक मुलांनी यात भाग घेतला.सदर कार्यक्रमात दिव्यांग मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून सर्वांनाच थक्क केले. महाराष्ट्र राज्याचे मुख्य मंत्री संन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी कार्यक्रमास भेट देऊन कौतुकाची थाप दिली. तसेच संन्माननीय आमदार संजय केळकर साहेब, अध्यक्ष आमदार निरंजनजी डावखरे,मा.नगरसेविका मृणालजी पेंडसे ,नम्रताजी कोळी,सुजीतजी पत्की,सितारामजी राणे यांनीही भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली. गेल्या वर्षभरात विशेष कार्य केलेल्या दिव्यांग मुलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या वेळी दिव्यांग मुलांनी स्वच्छतेबाबत संदेश दिला. या उपक्रमाबद्दल समस्त पालक वर्गाकडून मा.नगरसेविका प्रतिभा मढवी व डॉ.राजेश मढवी यांचे आभार मानण्यात आले.









Categories: Thane matters











