शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज कर्जत शहराची बैठक शिवालय येथे संपन्न झाली. या बैठकीत शहरातील विविध भागातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यामध्ये शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. सोबतच हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आजच्या बैठकेचे आयोजन शहराच्या वतीने केले होते. सदर बैठकीस जिल्हा संघटक सुवर्णाताई जोशी, तालुका प्रमुख उत्तम शेठ कोळंबे, कर्जत तालुका महिला संघटक करुणाताई बडेकर, कर्जत शहर प्रमुख निलेश घरत, माजी कर्जत शहर प्रमुख, भालचंद्र नारायण जोशी, कर्जत शहर संपर्क प्रमुख संजय मोहिते, माजी नगरसेवक संतोष पाटिल, कर्जत शहर महिला संघटक मयुरी गजमल, कर्जत शहर समन्वयक अरुणा मोरे, कर्जत शहर महिला संघटक सारिका शेटे, कर्जत शहर महिला संपर्क प्रमुख मोहिनी मोहिते, नगरसेविका कर्जत नगरपरिषद संचीता पाटील, कर्जत शहर संघटक मुकेश पाटील, कर्जत उपशहर प्रमुख प्रसाद डेरवणकर, विनोद पांडे, प्रमोद खराडे, कर्जत शहर समन्वयक सुदेश देबघरे, उपशहर संघटक राजेंद्र मोडक, अभिजित बेडेकर, दिलीप अंबावणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.






Categories: कर्जत Matters











