हिंदुस्थानच्या पवित्र भूमिस आपला वाघासमान पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांना अर्पण करणाऱ्या वीर राजमाता,शिवबा केवळ आमचा पुत्र नसून संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा पुत्र आहे असे मानून हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ज्यांनी उभारलं अशी थोर जगजननी जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त १२ जानेवारी रोजी शिवालय येथे जिजाऊ माँसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले.यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीनदादा सावंत,तालुका प्रमुख उत्तमशेठ कोळंबे, उमरोली विभागप्रमुख दिनेश भासे तसेच अनेक शिवसैनिक उपस्थित होते.


Categories: कर्जत Matters











