कर्जत स्टेशन वरील पुणे दिशेने असलेल्या फुटओव्हर ब्रिजचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम अगदी संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . त्यात कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध देखील नाही . हे काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं निवेदन कर्जतचे नगराध्यक्ष सुवर्ण जोशी यांनी रेल्वे प्रशासनाला दिले, तसेच वेळेत हे काम पूर्ण न झाल्यास आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
सुवर्णा जोशी यांनी कर्जत स्टेशन मॅनेजर यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते . या ब्रिजचं काम सुरू होऊन बरेच दिवस झाले असून काही दिवसापूर्वीच केलेला हा पूल इतका कमकुवत कसा, तसेच त्याची दुरुस्ती किती काळ चालणार या मुद्द्यांवर चर्चा केली. हे काम सुरू करण्याआधी रेल्वेने पर्याय व्यवस्था उपलब्ध करून दिली नाही यामुळे आज अनेक शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक रूळ ओलांडून आपला जीव धोक्यात घालत आहे. जर रूळ ओलांडताना कुणाचा अपघात झाला तर जबाबदार कोण असे अनेक सवाल नगराध्यक्ष सुवर्ण जोशी यांनी रेल्वे प्रशासनाला विचारले. तसेच स्टेशनच्या मध्यभागी एक एफओबी व्हावा अशी मागणी देखील केली आहे. स्टेशन मास्तरांना निवेदन करण्यात आले की जास्त माणसे लावून हा ब्रिज लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा . स्टेशन मास्तरांकाढून असे कळलें की ब्लॉक मिळत नाही म्हणून त्यांचं काम होत नाहीये. सुवर्णाताई जोशी यांनी त्वरित डीआरएम कडे फोन करून तशी मागणी केली . काम वेळेस पूर्ण नाहीं झाले तर त्यानंतर जनआंदोलन करण्याचा इशारा कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्ण जोशी यांनी केला .


Categories: कर्जत Matters











