ठाकरे गट शिवसेनेच्या उत्तर रायगड उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी कर्जत नगरपरिषदेचे गटनेते नितीन सावंत यांच्यावर देण्यात आल्यानंतर नितीन सावंत यांनी कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघात दिवसरात्र मेहनत घेत शिवसेना पक्ष वाढीवर भर देत विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. विधान परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन नितीन सावंत यांनी खोपोली नगरपालिका हद्दीतील सहकारनगर येथे श्री साईबाबा मंदिर करुन दिल्याने सहकार नगर परिसरातील नागरिकांसह खोपोली जनतेने नितीन सावंत यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, विधानसभा संपर्कप्रमुख डॉ. सुनील पाटील, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, प्रवक्ते विलास चालके, डिकसळ शाखाप्रमुख समीर साळोखे, उपशहरप्रमुख राजन सुर्वे, युवासेना उपशहर अधिकारी जयेश पाटील, आदीप्रमुखासह मोठ्या भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यात सत्तातंरानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्याने मोठा संघर्ष सुरू आहे. बहुतांश शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना पाठिंबा देत उध्दव ठाकरेंचे समर्थन करत ठाकरे गट पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मेहनत घेत आहेत . कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातही उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी ही पक्ष वाढीवर भर देत कार्यकर्त्यांना बळ देऊन मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या मार्गी लावण्याचे काम केले आहे . खोपोलीमधील सहकारनगर परिसरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन विधान परिषदेच्या माध्यमातून ५ लाख रुपयांचा निधी सामाजिक सभागृहासाठी उपलब्ध करुन दिल्याने त्या आशयाचे नियुक्ती नितीन सावंत यांनी ग्रामस्थांना दिले आहे.
Categories: कर्जत Matters











