कर्जत शहरात रॉयल कर्जत कॅम्प या ठिकाणी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी आढावा बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत शिवशाखा संपर्क अभियान संदर्भात तसेच पक्षाची पुढील वाटचाल,पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याविषयी सविस्तर चर्चा झाली.तसेच नव्याने पक्ष प्रवेश केलेले रियाज शेठ बुबेरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी संपर्कप्रमुख बबन दादा पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर उपजिल्हा प्रमुख नितिन दादा सावंत,तालुका प्रमुख उत्तम कोंळबे,जिल्हा महिला संघटिका सुवर्णा ताई जोशी तसेच कर्जत तालुक्यातील महिला आघाडी,युवा सेना पदाधिकारी तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.



Categories: कर्जत Matters











