शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसैनिकांमध्ये मोठा संघर्ष सुरू आहे . काही शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तसेच काही शिंदे गटाचे समर्थन केल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये संघर्ष अधिकच तीव्र बनला होता. काही शिवसैनिकांच्या म्हणण्या प्रमाणे शिवसैनिकांचे दिशाभूल व अमिषा दाखवत त्यांना शिंदे गटात फोडण्यासाठी शिंदे गटाकडून मोठे शर्तीचे प्रयत्न शुरू होते . काहींनी शिंदे गटात प्रवेश केले परंतु काही शिवसैनिकांनी आपला परतीचा मार्ग स्वीकारत ठाकरे गटात पुन्हा येण्याचा मार्ग निवडला.
तांबाटी येथील अविनाश आमले यांनी आपल्या जवळपास १५० सहकाऱ्यांना सोबत घेऊन संपर्कप्रमुख बबन दादा पाटील, जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर, सह संपर्कप्रमुख भाई शिंदे, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थित १२ मार्च रोजी ठाकरे गट शिवसेनेत प्रवेश केला . ठाकरे गट शिवसेनेत परतीचा ओघ सुरू झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, कर्जत तालुकाप्रमुख उत्तम कोळबे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख निखिल पाटील, सचिव प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, सहसंपर्कप्रमुख अविनाश भासे, युवासेना सचिव संपत हडप, तालुकाप्रमुख रामदास घरत, शाखाप्रमुख समीर साळोखे , राजेश जाधव, संतोष बामणे, माजी नगरसेवक संतोष पाटील, उपशहर अधिकारी जयेश पाटील, रघुनाथ कोळबे, महेश पाटील, भालचंद्र कदम, विभाग प्रमुख राजेश चोरगे, उत्तम देशमुख, बंटी नलावडे, संतोष देशमुख, जितू दळवी, योगेश अगिवले, सचिन गायकवाड, दामोदर सावंत, संतोष दळवी, दिनेश दळवी, प्रकाश महामुंडकर ,दीपक राणे, अशोक बामणे, रंजना राणे, तानाजी सावंत, तुषार मुंडे, बिपिन भोसले, आदी प्रमुख का सह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते . उद्धव ठाकरे यांच्या संकटाच्या काळात शिवसैनिकांनी ठाकरे गट शिवसेना मजबूत करण्यासाठी अनेक अडथळे दूर करून प्रयत्न केल्याने या ठिकाणी ठाकरे गट मजबूत राहिल्याने निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारत असल्याचे पहायला मिळत आहे.
अविनाश आमले यांनी आपल्या जवळपास दीडशेहून अधिक सहकाऱ्यांना सोबत घेऊन ठाकरे गट शिवसेनेत पुन्हा जाहीर पक्षप्रवेश उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थित उपस्थितीत कर्जत खालापूर विधानसभा शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात केला . शिवसेनेत कार्यकर्त्यांचा परतीचा ओघ सुरू झाल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
Categories: कर्जत Matters











