जुने ठाणे नौपाडा भागात ट्राफिकची समस्या खूप मोठी आहे. ठाणे रेल्वे स्टेशन परिसर, एस टी डेपो, तलावपाळी, बाजारपेठ येथे कायम ट्राफिकची समस्या आ वासून उभी आहे. अशामध्ये ट्राफिक पोलीस हे उन्हातान्हात उभे राहून आपली सेवा देत आहेत. पण वाढती वाहनसंख्या, लोकसंख्या याचा प्रचंड भार पडत आहे. अशा आपल्या पोलिस बांधवांना एक मदत म्हणून डॉ राजेश मढवी फाऊंडेशच्या वतीने टेबल, खुर्च्या, मेटल क्लॅम्प अशा वस्तू देण्यात आल्या.
सदर उपक्रमात ठाणे ट्राफिक उपायुक्त डॉ. विनायकजी राठोड,महापालिका उपायुक्त पाटोळे,ढोले,ज्येष्ठ मा.नगरसेवक संजयजी वाघुले, सुरेशजी जोशी, डॉ. राजेश मढवी ,पोलीस निरीक्षक मायने, मीतेश शहा,दिपक क्षत्रिय इतर मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या वतीने मा. नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी मान्यवरांचे अभार मानले.
Categories: Uncategorized











