सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची पातळी खाली गेली आहे. अनेक ठिकाणचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने महिला वर्गासह नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून असाच पाणी टंचाईचा सामना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील कळंब जिल्हा परिषद वार्डातील अंभेरपाडा गावातील महिला व ग्रामस्थांना करावा लागत असल्याचे पाहायला असताना येथील पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून येथील ग्रामस्थांनी आपल्या व्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडल्या असता या व्यथेची दखल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी घेत अंभेरपाडा गावात 27 एप्रिल रोजी बोअरवेल मारुन दिल्याने शिवसेनेच्या कामगिरीचे कौतुक करित उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या सामाजिक बांधीलकीचे ग्रामस्थांनी व महिला वर्गानी कौतुक केले आहे. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संघटक बाबू घारे, युवासेना सचिव अॅड.संपत हडप, उपतालुका प्रमुख दशरथ भगत, रामदास घरत, दिनेश भोईर, माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके, माजी सभापती पंढरीनाथ राऊत, विभागप्रमुख लक्ष्मण पोसाटे, जिल्हा परिषद संघटक पांडुरंग बागडे, बाजीराव दळवी, पंचायत समिती विभागप्रमुख गणेश मोडक, योगेश भोईर, माजी विभागप्रमुख माधव कोळंबे, संतोष ऐनकर, सरपंच वसंत हुंगे, शाखाप्रमुख सुरेश अगिवले, प्रथमेश सुपे, पोलीस पाटील त्रिंबक असवले, जेष्ठ नागरिक तुकाराम आढळ, महादू सुपे, बळीराम लांगी, चिंतामण असवले, बाळू आंबरे, विजया आंबेरे, काळूराम आंभेरे, राजाराम कोकाटे, तुकाराम तिटकरे, भागा सुपे, गणपत केवारी, श्याम तिटकरे, शंकर आठवळे, वाळकू गवारी, योगिता आढळ, नीता गवारी, जिजाबाई असवले, जानकाबाई पारधी आदीप्रमुखासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शिवसैनिक – युवासैनिक उपस्थित होते.
तर शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला कानमंत्र 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या ब्रीदवाक्याप्रमाणे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व येथील अन्य शिवसेना पदाधिकारी – शिवसैनिक – युवासैनिक काम करित असून येथील सर्वसामान्यांना या माध्यमातून मदतीचा हात आणि अनेक वर्षाचे प्रश्न मार्गी लागत असल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पदाच्या कारभाराचे सर्व कौतुक होत आहे. सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असून एप्रिल महिना अखेरीस अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागली असल्याने नागरिक त्रस्त आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागावा याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी लक्ष केंद्रित करावे अशी मागणी जोर धरत असताना अंभेरपाडा गावातील ग्रामस्थांची समस्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लक्षात घेऊन उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या संकल्पनेतून अंभेरपाडा गावात 27 एप्रिल रोजी बोअरवेल मारुन दिल्याने शिवसेनेच्या कामगिरीचे कौतुक करित उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या सामाजिक बांधीलकीचे ग्रामस्थांनी आभार मानले.
Categories: कर्जत Matters











