शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंतमुळे पाणीटंचाई संपुष्टात कर्जतच्या सहावाड्यांत धो धो पाणी
कर्जत खालापूरच्या अनेक गावांमध्ये ग्रामस्थांना मार्च सुरू झाला की पाणीटंचाई मुळे त्रास सोसावा लागतो . हे चित्र कर्जतच्या सहावाड्यांमध्ये मात्र यावर्षी बदललेले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने दोन बोअरवेल खोदून दिल्यामुळे बोंडशेतसह सहा वाड्यांची तहान भागली आहे. बोअरवेलला पाणी लागल्यामुळे पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. अशाच पाणीटंचाईचा सामना कळंब जिल्हा परिषद विभागातील अनेक वाड्या पाड्यांना येत असून बोंडेशेत येथील महिला व ग्रामस्थांना देखील येत होता . येथील पाणी प्रश्न मार्गी लागावा म्हणून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी ग्रामस्थांना बोअरवेल मारून दिले.
नितीन सावंत यांनी तालुक्यातील तीव्र पाणीटंचाईग्रस्त दुर्गम 16 आदिवासी वाड्यांना पाणीटंचाई मुक्त करण्याचा ध्यास घेतला त्यांनी खोदून दिलेल्या बोअरवेलमुळे पहिल्या टप्प्यात सहवाड्यांचे तहान भागले आहेत.
नितीन सावंत यांनी स्वखर्चाने बोअरवेल खोदून दिल्यामुळे सहा वाड्याची पाणीटंचाई कायमची मिटली आहे ग्रामस्थांनी शिवसेनेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आहे.
Categories: कर्जत Matters











