रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक दुर्गम भागात असलेल्या इरशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या आदिवासी पाड्यावर दरड कोसळल्याची घटना बुधवारी रात्री १ च्या सुमारास घडली. ही दुर्घटना अत्यंत मन सुन्न करणारी आहे. यामध्ये ५० हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बचाव कार्य सुरु आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ९० % वाडी ढिगाऱ्याखाली गेली आहे, ३० ते ३५ आदिवासी घरांची मोठी वस्ती होती. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली असण्याची शक्यता आहे. नितीन सावंत यांनी आज मा.मंत्री युवासेनाप्रमुख श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या समवेत सदर दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली व मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री.अंबादासजी दानवे, विधान परिषदेचे आमदार श्री.अनिलजी परब, मा.आमदार श्री.मनोहरशेठ भोईर, जिल्हाप्रमुख श्री.बबनदादा पाटील उपस्थित होते.
झालेल्या दुर्घटनेमधील काही नागरिकांना वाचविण्यात यश आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे त्या बचावकार्यास यश येवो आणि ते सुखरूप बाहेर यावेत ही ईश्वरास प्रार्थना.! व या दुर्दैवी घटनेत मृत झालेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Categories: कर्जत Matters











