"शेतकरी शिक्षण संस्था"नवी मुंबई Matters

शेतकरी शिक्षण संस्था इंग्रजी माध्यम, घणसोली या विद्यालयात शिकणाऱ्या कु. प्रणव अभय दिवेकर याने स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला.

शेतकरी शिक्षण संस्था इंग्रजी माध्यम, घणसोली या विद्यालयात शिकणाऱ्या इयत्ता नववी ब मध्ये शिकणारा विदयार्थी कु. प्रणव अभय दिवेकर याने प्रियदर्शनी संस्थेमार्फत आयोजित केलेल्या रनिंग रेस या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे ही शाळेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. विद्यालयाचे अध्यक्ष माननीय डी.बी. म्हात्रे साहेब , सेक्रेटरी श्री. पी. के. म्हात्रे साहेब, खजिनदार श्री. प्रभाकर पाटील साहेब व श्री. सुविध म्हात्रे साहेब तसेच इतर पदाधिकारी यांनी विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक केले तसेच त्याला मार्गदर्शन करणारे पी. टी. चे शिक्षक श्री. राजेश चंद्रकांत शेळके यांचे देखील कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांना सतत प्रोत्साहन आणि प्रेरणा देणाऱ्या विद्यालयाच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुरेखा पाटील मॅडम आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली पाटील मॅडम, मराठी विभागाचे मुखाध्यापक श्री उमेश कोलते सर,विद्यालयातील शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारीच्याकडून ही अभिनंदन करण्यात आले.

Leave a comment