महाराष्ट् matters

विको लॅबोरेटरीज चे हल्दी है तो हेल्दी है हे महत्त्वपूर्ण अभियान अधिकच तारांकित: श्री. संजीव पेंढारकर

सात दशकांहून अधिक काळ वारसा असलेले स्किनकेअर मधील प्रसिद्ध नाव म्हणजेच विको अत्यंत आनंदाने व अभिमानाने सुप्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडन आणि उगवत्या स्टार सुहानी सेठी यांच्या सोबतच्या नवीन सहकार्याची घोषणा करत आहे.
हे विकोने उचललेले एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक पाऊल आहे. विको ने या नवीनतम मोहीमेत परंपरा आणि सौंदर्य यांच्यातील अंतर कमी केले आहे.
भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व असलेल्या रवीना टंडन ना विको ने आपल्या स्किनकेअरच्या पोर्टफोलिओ साठी ऑनबोर्ड केले आहे.
सायली संजीव आणि तेजश्री प्रधान यांचा समावेश असलेल्या व प्रभावी सेलिब्रिटींच्या समर्थना मुळे बाजारपेठेत चांगल्याच गाजलेल्या यशस्वी “स्वदेशी निखार” या मोहिमेमध्ये आता रवीना टंडन यांचीही भर पडली आहे.
रवीनाजींचे आदरणीय व्यक्तिमत्व व त्यांचे कालातीत अपील “विको” या ब्रँडचा ठळकपणा व आकर्षण वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे हे निश्चित.
या नवीन मोहिमेमध्ये, विको, रवीना टंडन आणि सुहानी सेठी यांच्यातील एक अनोखा समन्वय दाखवत आहे, ज्यात स्किन‌ केअर सोल्यूशन्स ची संकल्पना पिढ्यानपिढ्या कशी रुजली आहे, व स्किन केअर सोल्यूशन्स पिढ्यानपिढ्या कशी वापरली व सुचवली जातात यावर भर दिला आहे.
“पत्थर के फूल” (१९९१) मधील तिच्या पदार्पणापासून ते “पटना शुक्ला” (२०२४) मधील अलीकडील यशापर्यंत, रवीनाची चमकदार कारकीर्द, तिची चिरस्थायी प्रतिभा आणि विश्वासार्हता दर्शवते.
तिची वृद्धत्वाकडची डौलदार वाटचाल आणि आदरणीय पातळी या मोहिमेचा संदेश अधिकच प्रभावी करत, विकोला क्लासिक आणि समकालीन ब्रँड म्हणून स्थान देण्याचे महत्वपूर्ण काम करते.
“स्टुडंट ऑफ द इयर 2” (२०१९), “कठपुतली” (२०२२) तसेच लोकप्रिय टीव्ही मालिका “गन्स अँड गुलाब” (२०२२) यांच्या मधील भूमिकांसाठी ओळखली जाणारी सुहानी सेठी ही उत्साहाने तळपणारी तरुण अभिनेत्री रवीनाजीं सह या मोहिमेत सामील होत आहे.
सुहानीचे उत्साही आणि प्रभावी व्यक्तीमत्व किशोरवयीन तसेच तरुण प्रौढांना प्रभावित करण्यासाठी सुयोग्यच आहे.
या दोघींची उत्तम केमिस्ट्री समाजाचा “विको” या ब्रँड वरचा विश्वास व विको ची लोकप्रियता अनेक पटींनी वाढवेल हे निश्चित!

Leave a comment