नवी मुंबई Matters

महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना यांनी आयोजित केलेल्या या फॅशन शोमध्ये महिलांच्या लक्षणीय सहभाग

महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना यांनी आयोजित केलेल्या या फॅशन शोमध्ये महिलांच्या विविध क्षेत्रातील लक्षणीय सहभाग दर्शवण्यात आला. २९ ऑगस्ट २०२४ रोजी गडकरी रंगायतन येथे श्रावण सोहळा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्यापक उपक्रमाचा एक भाग म्हणून फॅशन शोने समकालीन आणि पारंपारिक फॅशन ट्रेंड दोन्ही अधोरेखित केले.

या फॅशन शोमध्ये १०० हून अधिक जण सहभागी झाले होते. तरुण व्यावसायिकांपासून ते फॅशनविस्टापर्यंत महिलांनी फॅशनच्या माध्यमातून आपलेपणा आणि आत्मविश्वास व्यक्त करण्याची संधी स्वीकारली. पारंपारिक मराठी वेशभूषा आणि आधुनिक, नाविन्यपूर्ण डिझाईन्स असलेले या फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते.

प्रेक्षक सदस्यांना प्रोत्साहित करत होते . या फॅशन शोने केवळ महिलांना आपली फॅशन दाखवण्याची संधी दिली नाही, तर त्यांनी आपली कला सादर केली आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले योगदान दिले. हा कार्यक्रमा मुळे महिलांना आपली वैयक्तिकता आणि आत्मविश्वास व्यक्त करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एसएस केबल आणि १ अँड १ ब्रॉडबँडचे मालक श्री मंगेश वालांज , सामाजिक कार्यकर्ते श्री योगेश शर्मा, व  श्री सुनील इंगळे एका प्रमुख व्यावसायिक यांनी उपस्तीथी दर्शावली , महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना यांच्या महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून  सन्मानित केल्याबद्दल सन्माननीय अतिथींचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांच्या सहभागामुळे या कार्यक्रमाला खूप महत्व प्राप्त झाले आणि आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात महिलांना मदत करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या विचारांचा आणि प्रोत्साहनाचा कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला. आपले ध्येय गाठण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि भविष्यातील प्रयत्नांमध्ये त्यांना सातत्याने पाठिंबा देण्याची अपेक्षा करतो.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रायोजकांचे मनापासून आभार.

‘महाराष्ट्रमॅटर्स आणि वीरांगना’ यांनी नुकत्याच पार पडलेल्या महिला सशक्तीकरणाच्या कार्यक्रमाला ज्यांनी अभूतपूर्व यश दिले त्याप्रति मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या प्रायोजकांची बांधिलकी आणि योगदानाशिवाय हा कार्यक्रम शक्य झाला नसता. एसएस केबल आणि १ अँड १ ब्रॉडबँडचे मालक श्री मंगेश वालांज यांचे आम्ही मनापासून आभार मानत त्यांचे सत्कार करण्यात आले . कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. त्याचप्रमाणे सोन कलाश दागिने संघाचे मालक मंगेश महाडिक यांचाही मनापासून आभार व सत्कार करण्यात आला. सेररा सर्विसेस चे मालक, सौ. सुप्रिया चौधरी यांचा देखील आभार . जबीन कोचिंग क्लास चे मालक जबीन शेख यांनीही आपल्याला समृद्ध करण्याची संधी दिल्याबद्दल विशेष उल्लेख केला पाहिजे. महिला सक्षमीकरणाप्रती आणि प्रायोजकतेसाठी मैपल्स ब्यूटी पार्लरच्या मालक तनुजा शाह यांचे आम्ही आभार मानतो. नरी शक्तीचे अध्यक्ष गीतांजली माने यांचे विशेष आभार, सामाजिक कार्यांना सातत्याने पाठिंबा आणि समर्पण केल्याबद्दल मदत सामाजिक संस्था चे  मालक शशी अग्रवाल यांचे आभार मानतो. हे प्रायोजक आपल्या समाजावर कायमस्वरुपी प्रभाव पाडतात आणि आम्ही भविष्यातील सहकार्याची अपेक्षा करतो.

या कार्यक्रमाला चला हवा येऊ द्या फेम दिव्येश शिरवंडकर व  स्मिता घाटके कॉर्पोरेट आणि सामाजिक स्तरावरच्या निवेदक असे उत्कृष्ट अँकर लाभले .

मिसेस युनिव्हर्स एम्पथी २०२२ , मिसेस नॉर्थ वेस्ट आशिया २०२१ , मिसेस महाराष्ट्र २०१९, मिसेस युनियुनिमॉम ब्युटी क्वीन २०२० अशा अनेक खिताब विजेते कार्यक्रमाच्या परीक्षक स्वाती ठक्कर यांनी दोन अंतिम स्पर्धकांची निवड केली. प्रथम पारितोषिक श्वेता देशमुख यांना तर द्वितीय पारितोषिक सुजाता तोडकर यांना मिळाले. प्रथम पारितोषकाला नारी शक्ती च्या अध्यक्ष सौ. गीतांजली माने यांच्या वतीने एक पैठणी व एक ट्रॉफी आणि द्वितीय पारितोषकाला सौ शशी अगरवाल यांच्या वतीने एक पैठणी देण्यात आली .

Leave a comment