ठाणे प्रतिनिधी जुई खाडे – ठाणे शहरातील वर्तक नगर येथे यंदा शारदीय नवरात्रोत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. सन्मान युवा प्रतिष्ठानच्या संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक व शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्याने होत असलेल्या या नवरात्र उत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्यात प्रभू श्रीरामाची बालाजी ची मूर्तीच्या मधोमध देवी अंबे मा विराजमान होत आहे त्यामुळे भाविकांना भक्तीचा त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे .सन्मान युवा प्रतिष्ठानचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून या नवरात्र उत्सवांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक राजेंद्र फाटक व राधिका फाटक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी शिवसेना सचिव सेने नाट्य अभिनेते सुशांत शेलार उपस्थित होते. ठाण्यातील वर्तक नगर येथे दत्त मंदिर जवळील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44 च्या पटांगणात सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेली २४ वर्षे सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा केला जातो यंदा पंचविसावा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृतीचा प्रेक्षणीय देखावा ५००० स्क्वेअर फुट जागेमध्ये ४० बाय ६० फुटांच्या आकारात साकारण्यात येत आहे या पत्रकार परिषदेला उपविभाग प्रमुख समीर उरणकर शाखाप्रमुख अनिल भोईर आदी जन उपस्थित होते.



Categories: Thane matters











