ठाणे, दि. ४ – दिवाळीचे सणाचे औचित्य साधून ठाणे महापालिका प्रभाग क्र. २२ करिता आरोग्य दूत म्हणून ओळखले जाणारे निखिल बुडजडे यांनी रांगोळी आणि किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. `अबकी बार शिंदे सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहिण योजना, हिंदुत्व आणि शिवसेना दोन्ही माझ्या सोबत’ अशा आशयाच्या अनेक रांगोळ्या प्रभागातील महिलांनी साकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
किल्ले स्पर्धेत भव्य किल्ले साकारत किल्ल्यांबद्दलची ऐतिहासिक ठळक वैशिष्ट्ये स्पर्धकांनी मांडली. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि. १० नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे. किल्ले आणि रांगोळी स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, आकर्षक चषक, प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेणाऱ्या किल्ले स्पर्धेतील सर्व मंडळांना प्रशस्तीपत्रक देण्यात येणार असल्याची माहिती निखिल बुडजडे यांनी दिली.








Categories: Thane matters











