१४६ ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज ठाणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा भीमनगर येथून आमदार प्रताप सरनाईक प्रचाराला सुरुवात करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
वर्तकनगर पोलीस स्टेशन, दत्तमंदिर, मैथिली प्राईड, शास्त्री नगर नाका, शिवाई नगर शाखा, ठा.म.पा.शाळा, देवदया नगर, हनुमान मंदिर, वसंत विहार, वसंत विहार सर्कल, स्वामी विवेकानंद नगर, गांधी नगर, सुभाष नगर आदी ठिकाणांहून प्रचार रॅली मार्गस्थ झाली. मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवा, बालकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्याचबरोबर शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व मित्र पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.
रॅलीत सहभागी झालेले प्रत्येकजण विजयासाठी भरभरून शुभेच्छा देत होते, तसेच सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. आपण केलेल्या कामाची खरी पावती या प्रचार रॅलीच्या माध्यमातून आज नागरिक देत आहे हे पाहून अत्यंत समाधान वाटले आणि पुन्हा एकदा विजयाची मोहोर उमटवली जाईल असा आत्मविश्वास मिळत आहे.




Categories: Thane matters











