" Pratap sarnaik "Thane matters

आमदार सरनाईक यांना पाठिंबा देण्यासाठी श्रमजीवींच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात

राज्यात महायुतीचे सरकार येणार ; आमदार प्रताप सरनाईक हे येणाऱ्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असतील – विवेक पंडित

ओवळा माजिवडा विधासभा मतदारसंघाचे आमदार व शिवसेना , भाजप , राष्ट्रवादी काँग्रेस , आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांना श्रमजीवी संघटनेने आज जाहीर पाठिंबा दिला आहे. आमदार प्रताप सरनाईक यांचा या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित आहे. ते चौथ्यांदा निवडून तर येतीलच पण राज्यात पुन्हा भाजप – शिवसेना व मित्र पक्ष महायुतीचे सरकार येणार आणि त्यात सरकार म्हणून आमदार सरनाईक हे कॅबिनेट मंत्री असतील , असा विश्वास श्रमजीवी संघटनेचे संस्थापक व आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी व्यक्त केला. ठाणे , पालघर जिल्ह्यात वन पर्यटन सुरु व्हावे व आदिवासींच्या रोजगारासाठी यापुढच्या काळात अधिक प्रयत्न व्हायला हवेत असेही त्यांनी सांगितले.

ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रात ४४ आदिवासी गाव पाडे आहेत. या आदिवासी भागात श्रमजीवी संघटनेचे सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. महायुतीचे उमेदवार आमदार प्रताप सरनाईक यांना पाठिंबा देण्यासाठी आज श्रमजीवी संघटनेच्या प्रमुख नेते व पदाधिकारी , कार्यकर्त्यांची बैठक मीरारोड येथे झाली. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित स्वतः यावेळी उपस्थित होते व त्यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विवेक पंडित म्हणाले की , गेल्या १५ वर्षात आमदार सरनाईक यांनी संपूर्ण मतदारसंघात चौफेर विकास केला आहे. प्रत्येक समाज घटकासाठी झालेली विकासकामे व त्यांचा दांडगा जनसंपर्क या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे. त्यांच्या विजयाचे मताधिक्य वाढविण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढील १२ दिवस प्रयत्न करावेत. आमदार सरनाईक यांनी विकासकामे करीत असतानाच त्यांच्या मतदारसंघातील आदिवासी पाड्यांवरही विकासाची विविध कामे केली आहेत याचे विशेष कौतुक आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप शिवसेना महायुतीचे सरकार येणार आहे. आणि या सरकारमध्ये आमदार प्रताप सरनाईक हे कॅबिनेट मंत्री असतील असा विश्वास विवेक पंडित यांनी व्यक्त केला. ठाणे , पालघर मधील वनक्षेत्र जंगल कायम टिकले पाहिजे. याभागात वन पर्यटन सुरु केल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. आदिवासी तसेच स्थानिक भूमिपुत्र यांच्यासाठी येणाऱ्या सरकारमध्ये आमदार प्रताप सरनाईक यांनी नवनवीन विकास योजना आणाव्यात , आम्ही त्यांच्यासोबत आहोत असेही पंडित म्हणाले. आदिवासी पाड्यांवर मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या आहेत त्यांच्यासाठी रोजगार , आरोग्य , आधुनिक शिक्षण यासह सर्व सोयी सुविधा पोहोचविण्यासाठी अधिक प्रभावीपणे ते काम करत राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार प्रताप सरनाईक यांच्या कामाने आदिवासी , कष्टकरी , श्रमजीवी बांधव आनंदी असल्याने त्यांना संघटना पाठिंबा देत आहे याचा आवर्जून विवेक पंडित यांनी उल्लेख केला.

आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की , माझ्या मतदारसंघात २ ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तयार केले आहेत. पाच आदिवासी पाड्यांवर नवीन स्मशानभूमी तयार केल्या. ठाणे – मीरा भाईंदर भागात १० कोटी खर्च करून आदिवासी पाड्यांवर जाण्यासाठी सोलर पथदिवे लावण्यात आले आहेत. आदिवासी बांधवांसाठी जे जे करता येईल ते आजवर केले आहे. चेना व येऊर येथे नदीवर बंधारे तयार करून तेथे पाणी अडवून आसपासच्या लोकांना ते पाणी लवकरच उपलब्ध होणार आहे. काशिमीरा भागात जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यात आल्याने त्या पाण्याचा परिसरातील नागरिकांना फायदा होत आहे. ठाण्यात जवळपास १४० एकर जागेत मोठे प्राणी संग्रहालय (झू) तयार करण्याचा प्रस्ताव आहे जेणेकरून आसपासच्या आदिवासी व स्थानिकांना रोजगार मिळेल. तेथील आदिवासींना वनहक्काच्या जमिनी देऊन उर्वरित जागेवर ‘झू’ प्राणी संग्रहालय तसेच वन पर्यटन सुरु करण्याचा माझा संकल्प आहे. येऊर येथे पर्यटन स्थळ विकसित करण्याचे संकल्पित असून त्यामुळे रोजगार निर्मिती होईल. वन विभागाच्या परवानगीने आदिवासी गाव पाड्यांवर शक्य तितक्या नागरी सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे व यापुढेही करणार , असेही आमदार सरनाईक म्हणाले.

Leave a comment