महागिरी कोळीवाड्यात हळदीकुंकू २०२५: सामूहिक सहभागाचे चित्रण
दि. २२ जानेवारी २०२५ रोजी माजी नगरसेविका सौ. नम्रता जयेंद्र कोळी आणि भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांच्यातर्फे प्रभाग क्र. २२, महागिरी कोळीवाडा येथे हळदी-कुकूं समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रभागातील हिंदू, मुस्लिम व अन्य विविध जाती, धर्माच्या महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सर्व महिलांना हळदीकुंकूंनिमित्त वाण देवून पौराणिक कथेनुसार सुहासिनीमधील आदिशक्तीला शरण जाऊन तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आला. या हळदीकुंकू समारंभात महिलांना विरूगळा म्हणून विविध कोळी नृत्य, लावणी, छोट्या मुलींचा डान्स इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच महिलांमध्ये उत्साह भरण्यासाठी विविध खेळाचेही आयोजन केले होते. (जसे की, उखाणे, बांगड्या भरणे, मिस्टर अॅण्ड मिसेस) या खेळात महिलांना मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या खेळामुळे महिलांना आपल्यावरील संसाराचा ताण कमी करण्यास मदत मिळाली. सर्व महिलांना विविध गाण्यावर डान्स करून थिरकण्याची संधी आयोजकांनी करून दिली होती. एकंदरीत या उत्साह भरण्याचे काम आयोजकांनी केले. सर्व महिलांनी माजी नगरसेविका सौ. नम्रता जयेंद्र कोळी आणि ठाणे शहर भाजपा उपाध्यक्ष .आई बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी यांचे आभार व्यक्त केले.
माजी नगरसेविका मृणाल पेंडसे नंदा पाटील दीपा गावंड कमल चौधरी स्नेहा आंब्रे. प्रतिभा मडवी माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेविका मेघना सुनील हंडोरे. हिंदू जनजागृतीच्या सदस्या मानसी सुनेश जोशी भाजप सचिव श्रुतिका मोरेकर यांनी हळदीकुंकू समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली
तसेच या हळदीकुंकूं समारंभात महिला पोलिसांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी महिला पोलीस अधिकारी स्वप्ना ताते (एपीआय) यांनी महिलांना स्वयंसंरक्षार्थ, फसवणूक व सायबर क्राईमबद्दल जनजागृती करून महिलांचे मनोबल वाढविले.

























Categories: Thane matters











