मुंबई matters

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्याने उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवोत्सव’ कार्यक्रम संपन्न

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या औचित्याने वांद्रे कुर्ला संकुलात शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिवोत्सव’ कार्यक्रम संपन्न झाला. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या शिलेदारांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी १४६ ओवळा माजिवडा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी प्राप्त केल्याबद्दल मा. एकनाथजी शिंदे साहेबांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

या सोहळ्यात बाळासाहेबांचा आदर्श व त्यांच्या प्रखर विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेनेचे नेते, उपनेते तसेच खासदार, आमदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment