विहंग चॅरिटेबल ट्रस्ट व प्रताप सरनाईक फाऊंडेशनच्या माध्यमातून ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रामध्ये मकर संक्रातीनंतर गेल्या तीन वर्षांपासून भव्य-दिव्य असा हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला जातो. याही वर्षी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे साहेब व परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष श्री. पुर्वेश सरनाईक यांच्या सहकार्याने ओवळा माजिवडा विधानसभा महिला सेनेच्या प्रमुख सौ. परिषा सरनाईक यांनी लोकमान्यनगर ते घोडबंदर या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
यावेळी हळदी-कुंकू कार्यक्रमाबरोबरच लकी ड्रॉ आणि संगीताचे आयोजन केले जाते. त्यामुळे या कर्यक्रमाबाबत महिलांमध्ये आकर्षण व उत्सुकता असल्यामुळे हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून लोकप्रिय आहे. यंदाही ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे शहरामध्ये लोकमान्य नगर पाडा नं. ३ येथील डवले नगर मैदान, ठा.म.पा. शाळा क्र. ४४ वर्तक नगर येथील झेड.पी. मैदान, वसंत विहार येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे मैदान, घोडबंदर रोड कावेसर वाघबीळ येथील दादू गणपत पाटील मैदान येथे झालेल्या प्रत्येक कार्यक्रमाला तीन ते चार हजार महिलांनी सौभाग्याचे वाण देत एकमेकींना शुभेच्छा दिल्या. वेगवेगळ्या ठिकाणी निरनिराळे कलर कोड थीम ठेवण्यात आली होती. त्यानुसार महिलांनी कलर कोडप्रमाणे साड्या परिधान करून कार्यक्रमाला शोभा आणली. यावेळी महिलांनी एकमेकींबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या, काही महिलांनी डान्स करून आनंद व्यक्त केला.
या कार्यक्रमासाठी परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक साहेब उपस्थित राहिल्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली. तसेच शिवसेना महिला आघाडी ठाणे जिल्हासंघटक सौ. मीनाक्षी शिंदे, उप जिल्हासंघटक सौ. वंदना डोंगरे, नगरसेविका – सौ. आशा डोंगरे, सौ. विमल भोईर, सौ. राधिका फाटक, सौ. कल्पना पाटील, सौ. नम्रता घरत, सौ. साधना जोशी, सौ. जयश्री डेविड, विभागप्रमुख – श्री. रामचंद्र गुरव, श्री. भगवान देवकते, श्री. रवी घरत, श्री. संतोष ढमाले व शिवसेनेचे सर्व उप विभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख व पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते.








Categories: Uncategorized











