जागतिक महिला दिनानिमित्त विहंग चॅरीटेबल ट्रस्ट तर्फे ” हॅप्पी अँण्ड हेल्दी लाईफस्टाईल २०२५ ” या आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ दि. २३ मार्च, २०२५ रोजी घोडबंदर येथील हॉटेल विहंग इन या पंचतारांकित हॉटेलमध्ये साजरा करण्यात आला होता.
प्रत्येक महिला ही वर्षाचे बाराही महिने अहोरात्र कार्यरत असते. कधी आई, कधी बहीण, कधी पत्नी तर कधी बिजनेस वुमेन, ऑफिसर, सेक्रेटरी या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकवेळी प्रत्येक महिला स्वतःला सिद्ध करीत असते. त्यामुळे तिचा उत्सव ८ मार्च ह्या एका दिवसापुरता मर्यादित का ठेवावा ? प्रत्येक दिवस हा त्या महिलेचाच असतो, वर्षाचा प्रत्येक दिवस महिलांच्या सन्मानाचा दिवस असतो.
जागतिक महिला दिनानिमित्त नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा मानस विहंग चॅरीटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. परिषाताई सरनाईक यांचा असतो. आपल्या आप्तजनांचा विचार करण्यातच व्यस्त असणाऱ्या अनेक महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. महिलांचे जीवन आनंदी आणि शरीर सुदृढ राहावे यासाठी विहंग चॅरीटेबल ट्रस्ट नेहमीच प्राधान्य देत आले आहे. याच जाणिवेतून गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील विविध रहिवाशी गृहसंकुलातील महिलांकरिता ” हॅप्पी अँण्ड हेल्दी लाईफस्टाईल २०२५ ” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार सुदृढ आणि निरोगी आरोग्याच्या दृष्टीकोनातून व्यायामाच्या विविध प्रकारांचे सादरीकरण, योगासने, दानपट्टा आणि लाठीकाठी सारखे साहसी खेळ तसेच रुचकर पण फिटनेससाठी आवश्यक असणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचे सादरीकरण यासारख्या विविध प्रकारांमध्ये महिला समूहांनी भाग घेऊन जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या अनोख्या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला.
” हॅप्पी अँण्ड हेल्दी लाईफस्टाईल २०२५ ” या स्पर्धेमध्ये एकूण ७ सोसायटींनी भाग घेतला होता. त्यापैकी ४ सोसायटींनी आपल्या कौशल्याचे थेट सादरीकरण केले. त्यामध्ये प्रथम पारितोषिक – नीलकंठ पाम्स सोसायटी, द्वितीय पारितोषिक – गावंड बाग सोसायटी, तृतीय पारितोषिक – लक्ष्मी नारायण सोसायटी तर विशेष पारितोषिक – कॉसमॉस ज्वेलरी, घोडबंदर रोड यांनी पटकाविले. तसेच ३ सोसायटींनी आपल्या कौशल्याचे सादरीकरण करून त्याचे व्हिडीओ बनवून पाठविले. त्यामध्ये प्रथम पारितोषिक – संघवी हिल्स, घोडबंदर, द्वितीय पारितोषिक – सुकूर सोसायटी, घोडबंदर, तृतीय पारितोषिक – निहारिका सोसायटी, लोकपूरम यांनी पटकाविले. तसेच कुकिंग स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक – सुधा पाटील, द्वितीय पारितोषिक – डॉ. वर्षा घेवरीया, तृतीय पारितोषिक – अभिलाषा वैष्णव यांनी पटकाविले.
तसेच ठाणे शहरातील सुप्रसिद्ध लहान मुलांच्या हृदयविकारांचे विशेषज्ञ (पेडियाट्रिक कार्डिओलॉजीस्ट) डॉ. तृप्ती डोंगरे चंगळाणी ह्या ठाण्यात मागील १२ वर्षांपासून प्रॅक्टिस करीत असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत तसेच त्या अनेक वैद्यकीय संघटनांच्या सदस्या देखील असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महिला दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून डॉ. तृप्ती डोंगरे चंगळाणी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला खास आकर्षण प्रमुख पाहुणे म्हणून मराठी कलाकार संतोष जुवेकर उपस्थित होते. तर या स्पर्धांचे परीक्षक म्हूणून वृषाली फडारे, निकिता जैन, रुपाली शिंदे उपस्थित होत्या. अश्या अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला जाऊ शकतो यासाठी उपस्थित सर्व महिलांनी सौ. परिषाताई सरनाईक यांचे आभार मानले.




Categories: Uncategorized











